फिटनेस हा फक्त खेळाडूंनी मेंटेन ठेवला पाहिजे असा आपल्या काही लोकांचा समज आहे. खरं आहे मित्रांनो आजपर्यंत आपल्या इथे फिटनेस ( Fitness) बाबत म्हणावी तशी जागृती म्हणा किंवा त्याचे महत्व आपल्या लोकांना समजलं नाही, व त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्यात सुद्धा आपण कमी पडलो आहे. त्यातल्यात्यात आपले राजकीय नेते सुद्धा फिटनेस बाबत इतके जागृत असताना दिसत नाहीत या राजकीय लोकांनी सुद्धा आपल्या फिटनेस बाबत जागृत असलं पाहिजे. आपल्याला माहित आहे राजकीय लोकांच्याकडे नेहानी वेळेची कमतरता असते या सगळ्या व्यस्थ शेड्युल मध्ये त्यांचे शारीरिक स्वस्त्याहाकडे संपूर्ण दुर्लक्ष होते.. याच राजकीय लोकांना फिटनेसिसचे महत्व समजून सगळ्यासाठी एक तरुण धडपडतोय. एखादा माणूस शारीरिक दृष्ट्या सशक्त असेल तर तो त्याच काम देखील तितक्याच सशक्तपणे करू शकतो असं म्हणत हा तरुण आता राजकीय नेत्यांमध्ये फिटनेस बाबत जनजागृती करतो आहे. आता हे सगळं करण्यामागे त्याचा काय उद्देश आहे पाहुयात.
फिटनेस बाबत राजकीय लोकांच्यातच नाही तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा अजूनही बरेच अज्ञान आहे. खरंतर आज फिटनेसच्या नावाखाली बाजारात काय लूटमार चालू आहे हे आम्ही तुम्हाला सांगायला नको.. पण आता ज्या तरुणाची आम्ही ओळख करून देणार आहे त्याची सध्या फिटनेस क्षेत्रात मोठी चर्चा आहे. होय आपण नवीन ( Navieen ) या फिटनेसतज्ज्ञ (fitness expert) व वेटलिफ्टर (weightlifter) विषयी बोलत आहोत.. 'नवीन' आता फिटनेस या क्षत्रेत एक 'नवीन' आयडॉल बनतो आहे. आणि त्याच्या या प्रयत्नामुळे तो एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. लोकांची जनजागृती व त्यांना फिटनेसचे महत्व समजून सांगणे तर तो करतोच आहे पण या सोबत नवीनने आतपर्यंत अनेक गोरगरीब मुलांना वेटलिफ्टिंग (weightlifting) व पॉवरलिफ्टिंग (powerlifting) अशा खेळांचे पर्सनल ट्रेणिंग देऊन अनेक खेळाडू तयार केले आहेत. अगदी लहान वयात नवीनने या क्षेत्रात आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. पण आता त्याचा मानस आहे की आपल्या राजकीय नेत्यांना देखील फिटनेसची जनजागृती करण्याचा..
राजकीय नेते म्हंटले की आपल्याला माहित आहे त्याच्या पाठीवर कामाचा इतका व्याप असतो की, ना वेळेवर झोप, ना वेळेवर जेवण, दिवसभर प्रवास अशा अनेक गोष्टी यांच्या पाठीमागे असतात. यात काय होतं तर त्यांचे शहरीरीक नुकसान होते. इतक्या मोठ्या जनतेचे नेतृत्व करणारे राजकीय नेतेच जर तंदुरुस्थ नसतील तर कस होणार? हाच विचार काररून नवीनने आता या राजकीय लोकांना फिटनेसचे महत्व समजून देण्याचा चंग बांधला आहे. यासाठी तो त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. मग अनेकांना तो Offline तर अनेकांना online प्रकारे तो मागर्दर्शन करतो. सर्व राजकीय लोकांना शारीरिक दृष्ट्या फिट करण्याचे त्याचे ध्येय आहे तो या कामाची आता सुरवात करत असला तरी त्याने जो विचार केला आहे तो राजकीय लोकांनी देखील गांभीर्याने ध्यानांत घेणे गरजेचे आहे.
राजकीय नेते शारीरिक दृष्ट्या फिट असतील तर काय होईल..?
एकदा राजकीय नेता शारीरिक दृष्टया सक्त असेल तर सगळ्यात पहिला तर त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स वाढतो जो त्याला काम करण्याची एक नवीन ऊर्जा निर्माण करतो. राजकारणात काम करायचं म्हंटल तर जनसंपर्क अत्यंत महत्वाचा असतो. एखादा राजकीय नेत्यांची शारीरिक क्षमता वाढली तर त्या नेत्याचा आपसूक जनसंपर्क वाढतो. राजकीय नेत्यांचे अनेक फॉलोअर्स असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीच अनुकरण करणारे अनेक लोक असतात आता आपला राजकीय नेताच शारीरिक फिट नसेल तर त्याच्याकडून अशा लोकांनी काय आदर्श घ्यावा. एक आदर्श राजकारणी बनण्यासाठी तो व्यक्ती तंदुरुस्त असणं अत्यंत मत्त्वाचे असते. अनेक राजकीय नेत्यांचे आपण अकाली मृत्यू झाल्याच्या घटना पाहतो या पाठीमागे यांचं शारीरिक दुर्लक्ष हे मोठं कारण असत.. तर समाजात काम करत असतांना काही वेळ हा सर्वानीच आपल्या शारीरिक फिटनेससाठी देणे गरजेचं असत..
राजकीय लोकांना शारीरिक दृश्य फिट करण्याचा मानस ठेवणारा नवीन नक्की कोण आहे..?
कोच नवीन फिटनेस क्षेत्रात काम करणारा एक यशस्वी ट्रेनर (fitness expert) नावारूपास येतो आहे. नवीनने राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टर म्हणून स्वतःची विशेषता दाखवल्यानंतर आपल्या सारखे अनेक खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने फिटनेसज्ञ आणि प्रशिक्षक म्हणून अनेकांना घडवण्याचे तो काम करतो आहे.. या क्षेत्रात येताना त्याने इतरांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतः काही विशेष कौशल्य संपादन करून या क्षेत्रात यश मिळवले आहे. एखाद्या क्षेत्रात आधीपासूनच प्रस्थापित अनेक लोक असताना सुद्धा नवीनने या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. फिटनेसतज्ज्ञ व एक ट्रेनर म्हणून आत्तापर्यंत त्याने केलेल्या या यशस्वी वाटचालीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जे धैर्य दाखवलं आहे ते अविश्वसनीय आहे. फिटनेस इंडस्ट्री (Fitness Industry) मध्ये त्याने आजवर अनेक प्रतिभावान खेळाडू व अनेकांना जीवनाचा एक नवा मार्ग दाखवल्यानंतर आज या क्षेत्रात त्याने स्वतःच एक वेगळे नाव निर्माण केले आहे. आता त्याचा राजकीय लोकांना शारीरिक दृश्य फिट करण्याचा मानस आहे..
नवीन यांचा एकच उद्देश आहे फिटनेस आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राशी निगडित काम करणे.. इतकाच काय तो लोकांना आयुष्यात तंदुरुस्थ राहण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करतो. आज तो अनेकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारे प्रशिक्षण देतो आहे. त्याने आजपर्यंत घडवलेल्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळी[र्यंत यश मिळवले आहे. मुलांना खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी त्याची नेहमीच धडपड सुरु असते. आज देखील त्याचाकडे प्रशिक्षण घेण्यासाठी अगदी ग्रामीण भागातून अनेक मुलं येत असतात. देशासाठी असे खेळाडू निर्माण झाले पाहिजेत म्हणून तो त्यांच्याकडून अत्यंत कमी शुल्क घेऊन त्यांना प्रशिक्षण देतो. यासाठी त्यांचा खास 'ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग' हा कोर्स सुद्धा आहे.
त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्याने कामाप्रती दाखवलेल्या आवडीमुळे आज तो फिटनेसच्या क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचला आहे. हे सर्व त्यांने स्वतःच्या जिद्दीवर आणि अफाट परिश्रमामुळे उभं केलं आहे. या सर्व गोष्टींमुळे अनेकांच्या फिटनेस या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या समस्या परवडणाऱ्या किमतींमध्ये पूर्ण करणारा नवीन हा आज फिटनेस प्रशिक्षक म्हणून इथपर्यंत पोहोचला आहे. आता त्याचा राजकीय लोकांना शारीरिक दृश्य फिट करण्याचा मानस कितपत यशस्वी होतो येणाऱ्या काळात समजेलच.. नवीन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना @raonaveen108 या इंस्टाग्राम हॅन्डलवर फॉलो करा..