मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृहात नार्वेकर येऊन बसले. सुरक्षा रक्षकांनी नार्वेकरांनी आत कसे काय सोडले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आदित्य ठाकरेंनी त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर नार्वेकर उठून सभागृहाच्या बाहेर गेले. आमदारांनाच फक्त सभागृहामध्ये जाता येते. हा अधिकार केवळ आमदारांनाच आहे. मात्र मिलिंद नार्वेकर आतमध्ये कसे काय आले. असा प्रश्न उपस्थित होत आहे.