Dawood Ibrahim: भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्यात एका अहवालात दावा केला जात आहे की गुन्हेगार दाऊद इब्राहिमला काही अज्ञात लोकांनी विष प्राशन केले आहे, त्यानंतर दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमधील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. या वृत्तामुळे चर्चेला उधाण आले असून, माहितीची सत्यता आणि त्याचे संभाव्य परिणाम यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र ही बातमी सत्य असल्याची शक्यता एवढ्यासाठी बळावते आहे कारण कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमधे इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे, त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, दाऊदवर खरंच विषप्रयोग झालाय का? याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. पाकिस्तानमध्ये इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्याची बातमी आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद यांसारख्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही सर्व्हर डाऊन आहेत. याशिवाय ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम देखील काम करत नाहीत, असा दावा केला जात आहे.