Pakistan  Team Lokshahi
ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; नमाज सुरू असताना घडली घटना

या स्फोटात 28 जणांचा मृत्यू झाला आहे तर 150 जण जखमी आहेत.

Published by : Sagar Pradhan

पाकिस्तानमधून आता सर्वात मोठी बातमीसमोर आली आहे. पेशावरमध्ये एका मशिदीत भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट समोर आले आहे. या स्फोटात 28 जणांचा मृत्यू झाला आहे तर 150 जण जखमी आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावर पोलीस आणि तपास यंत्रणा पोहचल्या असून तपास सुरु आहे.

दरम्यान, या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राच्या माहिती नुसार नमाज सुरु असताना हल्लेखोरानं बॉम्बनं स्वत:ला उडवलं. चिंतेची बाब म्हणजे या हल्ल्यातील मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी नुकसान झाले आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी