ताज्या बातम्या

Beed : बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरले

बीडमध्ये जोरदार पाऊस पडत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

बीडमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. मागील दोन दिवसांपासून मांजरा धरण क्षेत्रासह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरले आहे.

त्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याची वाढती पातळी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने चार दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.

मांजरा नदीपत्रात 3494 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू असून दरम्यान पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता नदी काठच्या गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

या धरणावर बीड, लातूर धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे आता हे धरण भरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी