विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. काल महायुतीच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते मात्र ती पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता पत्रकार या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे.
मुंबईतील एमसीए सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यातच काल मंगळवारी रात्री महायुतीमधील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज महायुतीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.