Maharashtra Political Crisis LIVE | मी शिवसेनेतच, फक्त घटकपक्षांना सोडावे- उदय सामंत
Maharashtra Political Crisis : राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंग आठव्या दिवशीही सुटला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांच्या नजरा एकनाथ शिंदे गटाकडे लागल्या आहे.
Shweta Chavan-Zagade
मी शिवसेनेतच- उदय सामंत
मी शिवसेनेतच आहेत. फक्त घटक पक्षांच्या कचाट्यातून शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे सोबत आहे. शिवसेना कशी फोडली जात आहे, त्याचे एक उदाहरण राज्यसभेच्या निवडणुकीत दिसला. राज्यसभा निवडणुकीत शिवसैनिक असलेल्या कोल्हापूराच्या संजय पवार यांना घटक पक्षांनी पडाले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, गृहमंत्री अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता
बंडखोर मंत्र्यांच्या फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यवाही सुरू
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या समर्थकांचा ठाण्यात जल्लोष, फटाके वाजवत मिठाई वाटून साजरा केला आनंद...
38 बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताचे रक्षण करा, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश, बंडखोरांच्या संपत्तीलाही जपण्याचे निर्देश...
सुप्रीम कोर्टाचा बंडखोरांना मोठा दिलासा, 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत अपात्रतेच्या कारवाईला दिली स्थगिती...
संजय राऊत आज चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार नाही.. अलिबागमध्ये रॅलीचं कारण देत हजर न राहण्याचं स्पष्टीकरण.. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना समन्स.
रावसाहेब दानवेंच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात पुढील 2 दिवसांत भाजपचं सरकार येईल पण बंडखोरांचं नाही.. परंतू महाराष्ट्र हे पाप स्वीकारेल का? सामनाच्या अग्रलेखातून बंडखोरांना सवाल..
राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे पुणे पोलीस अलर्टवर... पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द..
बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता.. राज्यपालांची भेट घेत मविआचा पाठिंबा काढत असल्याचं पत्र देण्याची शक्यता.. सूत्रांची लोकशाहीला माहिती.
राज्यपाल कोश्यारींचं मुख्य सचिवांना पत्र... 22 ते 24 जून दरम्यान पास झालेल्या जीआरची मागितली माहिती.. भाजपच्या तक्रारीनंतर मुख्य सचिवांना विचारणा.
चर्चा करायची असेल तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात यावे- संजय राऊत
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, अनिल देसाईंचा खळबळजनक दावा
भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतच राहण्यास सांगितलं असून, येत्या एक ते दोन दिवसांत पुढील रणनिती ठरवली जाईल..
डोंबिवलीतील सेना शाखेतील एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढले