CRPF Team Lokshahi
ताज्या बातम्या

शिंदे गटातील आमदारांच्या घराबाहेर केंद्राकडून 'Y+' सुरक्षा

आमदारांच्या कुटुंबीयांना CRPF सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता कुटुंबांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत.

Published by : Team Lokshahi

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहाटीत आहेत. त्यांच्यांसह 40 आमदारांनी बंड पुकारलेल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काल अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात हल्ले केले. यामुळे या आमदारांना केंद्राची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना CRPF सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता कुटुंबांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत १५ बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. यापूर्वी बंडखोरांनी आरोप केला होता की, त्यांच्या 38 आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्यांकडून सातत्याने शिवसैनिकांना चिथवणारे वक्तव्य केले जात आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले वाढले आहे. दिल्लीतून कितीही औरंगजेब येऊ द्या, त्यांचं थडगं ह्या महाराष्ट्रात बांधलं जाईल. अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली आहे. तुमच्या ईडीला, सीबीआयला आम्ही घाबरत नाही.

या आमदारांच्या निवासस्थानी CRPF तैनात असेल

रमेश बोरनारे Ramesh Bornare

मंगेश कुडाळकर Mangesh Kudalkar

संजय शिरसाट Sanjay Shirsat

लता सोनावणे Latabai Sonawane

प्रकाश सुर्वे Prakash Surve

सदा सरवणकर Sadanand Saranavnkar

योगेश कदम Yogesh Kadam

प्रताप सरनाईक Pratap Sarnaik

यामिनी जाधव Yamini Jadhav

प्रदीप जायस्वाल Pradeep Jaiswal

संजय राठोड Sanjay Rathod

दादाजी भुसे Dadaji Bhuse

दिलीप लांडे Dilip Lande

बालाजी कल्याणकर Balaji Kalyanar

संदिपान भुमरे Sandipan Bhumare

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी