Breaking News Tema Lokshahi
ताज्या बातम्या

बंडखोरांची माहिती न दिल्याने 40 आमदारांच्या पीएस, सिक्युरिटीवर कारवाई

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

Published by : Team Lokshahi

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. राज्यातील गुप्तचर यंत्रणा फेल झाल्याचा फटका आता जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांना बसणार आहे. या सर्वांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.

नेपोलियन एकदा म्हणाले होते की, युद्ध जिंकण्यासाठी हजारो सैनिक तैनात करण्याऐवजी जर एक उत्तम गुप्तचर अधिकारी असेल, तर युद्ध होण्याआधीच ते जिंकता येते. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाआधी ठाकरे सरकारने हे लक्षात घेतले असते तर आज राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असती. शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी राज्यातील गुप्तचर यंत्रणेचे अपयश समोर आले होते. त्यानंतर गुप्तचर यंत्रणा प्रभावशाली न केल्यामुळे शिवसेनेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून समोर आले. भाजप नेते वारंवार ठाकरे सरकार कोसळणार असल्याचे जाहीर वक्तव्य करत असतांनाही राज्यातील इंटेलिजन्स यंत्रणा गाफील राहिली. त्यानंतर कारवाईच्या मोडमध्ये सरकार आला आहे.

अनेक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सूरतला गेले. पण, याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार आहे. आमदाराचे अधिकारी आणि पोलिसांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती दिली नाही. यामुळे आता राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे.

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना निकाल लागल्यानंतर पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबई सूरत रस्त्याने गुजरातपर्यंत पोहचले. पालघर जिल्ह्यातील तलासरीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा एकनाथ शिंदे यांना होती. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे आणि समर्थक 20 पेक्षा जास्त आमदार सूरतला रवाला झाले. इतकी मोठी घडामोड घडत असताना याची कल्पना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली नव्हती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी