Admin
ताज्या बातम्या

Mumbai Police Threat Call : दहशतवादी मुंबईत आल्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने केली अटक

दहशतवादी मुंबईत आल्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दहशतवादी मुंबईत आल्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. यासिन सय्यद असं आरोपीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी सकाळी तीन दहशतवादी मुंबईत आले आहेत, त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, असं यासिन सय्यद याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन करुन सांगितलं होतं.

फोन करणार्‍याने पोलिसांना मुजीब सय्यदचे नाव सांगितले आणि त्याचा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांक पोलिसांना दिला. पूर्व वैमनस्यातून अशाप्रकारे फोन करून खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले असून आरोपीने २०१३ साली हे सिमकार्ड विकत घेतले होते या सीमकार्डच्या मदतीने त्याने फोन केल्याचे समजते. एटीएसने आरोपीला अटक करून मुंबईत पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी