Madhya Pradesh Bus Accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, अपघातासंदर्भात अधिक माहितीसाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. त्याशिवाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
नेमकं काय झाले?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र महामंडळाची ही बस सकाळी 7.30 च्या सुमारास इंदूूरहून अमळनेरकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील 15 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही.
अपघातग्रस्त बसमध्ये महाराष्ट्रातील किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नसून, एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. जळगाव, धुळेमधून अधिकारी पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दखल
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं की, इंदूरहून येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. सीएम याबाबात अधिक माहिती घेत आहेत.
दरम्यान, एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री चौहान हे इंदूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट
दरम्यान, मध्य प्रदेशातील बस अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असून, स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्टटले आहे.
इंदोर अमळनेर बस मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर अपघातग्रस्त झाली असुन मदत कार्य सुरु आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तसेच जळगाव जि का नियंत्रण कक्षाशी 02572223180/02572217193 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
अपघातील 8 जणांची मृतांची ओळख पटली
1.चेतन पिता राम गोपाल जांगिड़ रा. निवासी नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान
2. जगन्नाथ पिता हेमराज जोशी वय 70 वर्षे रा. मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान
3. प्रकाश पिता श्रवण चौधरी उम्र 40 साल निवासी शारदा कॉलोनी अमलनेर जलगांव महाराष्ट्र
4.नीबाजी पिता आनंदा पाटिल उम्र 60 साल निवासी पीलोदा अमलनेरगां
5. महिला कमला भाई पति नीबाजी पाटिल उम्र 55 साल निवासी पिलोदा अमलनेर जलगांव
6.चंद्रकांत पिता एकनाथ पाटील उम्र 45 साल निवासी अमलनेर जलगांव (उपरोक्त 1 से 6 तक के मृतक की पहचान आधार कार्ड से की गई )
7.श्रीमती अरवा पति मुर्तजा बोरा उम्र 27 साल निवासी मूर्तिजापुर अकोला महाराष्ट्र परिजन द्वारा पहचान
8.सैफुद्दीन पिता अब्बास निवासी नूरानी नगर इंदौर परिजन द्वारा पहचान
मध्य प्रदेश प्रशासनासोबत संपर्कात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मध्य प्रदेशातील एसटी बसच्या अपघातानंतर घटनास्थळी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असूून, जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात असून शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे असेही त्यांनी सांगितले.