LPG|Subsidy  team lokshahi
ताज्या बातम्या

LPG सिलिंडरवर सरकार देतंय 200 रुपये सबसिडी, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

सरकारने अनुदानाबाबतची परिस्थिती स्पष्ट केली

Published by : Shubham Tate

देशातील वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत सरकारने 21 मे रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये लोकांना 200 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली होती. या घोषणेपासून सर्व लोकांना 200 रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. आता 200 रुपयांच्या या अनुदानाचा लाभ कोणत्या लोकांना मिळणार, हा संभ्रम सरकारने दूर केला आहे. (lpg subsidy rule only ujjwala yojana beneficiaries get 200 rupees subsidy)

एलपीजी सबसिडीबद्दल माहिती देताना सरकारने म्हटले आहे की 200 रुपयांच्या या सबसिडीचा लाभ फक्त पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांनाच दिला जाईल. याशिवाय 200 रुपयांची सबसिडी कोणत्याही सामान्य लोकांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार नाही. इतर सर्व ग्राहकांना विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर सबसिडीशिवाय खरेदी करावे लागेल.

सरकारने अनुदानाबाबतची परिस्थिती स्पष्ट केली

या प्रकरणाची माहिती देताना सचिव पंकज जैन यांनी सांगितले की, सरकार जून 2020 पासून एलपीजी गॅस सिलिंडरवर कोणतीही सबसिडी देत ​​नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सरकार जनतेला गॅस सिलिंडरवर कोणतेही अनुदान देत नाही. सध्या सरकार एलपीजी गॅस सिलिंडरवर एकच सबसिडी देत ​​आहे, जे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जात आहे.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे

दिल्लीत LPG सिलेंडरची (14.2 kg) किंमत 1,003 रुपये आहे. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून गॅस सिलिंडरमागे 200 रुपये सबसिडी दिली जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना हा गॅस सिलिंडर 803 रुपयांना मिळणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी दिल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर 6,100 रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढेल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी