LPG चे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. सरकारनं अनेक महिन्यांच्या कालावधीत व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत बदल केले आहेत.
मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली. मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपयांवर कायम आहे.
या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी सिलेंडर आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.