ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाकेंचं अंतरवालीतील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे. ओबीसी आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये याचे लेखी आश्वासन सरकारने द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अंतरवली सराटी जवळच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत.