Navjot Singh Sindhu Team Lokshahi
ताज्या बातम्या

सिद्धूला शिक्षा झाली ते 34 वर्षांपुर्वीचं प्रकरण समजून घ्या 8 मुद्यांमधून...

पंजाब पोलिस करणार अटक

Published by : Team Lokshahi

Navjot Singh Sidhu Road Rage Case : सुमारे 34 वर्षांपूर्वी घडलेल्या एका रस्त्यावरील वादाच्या प्रकरणात काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sindhu )यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. IPC च्या कलम 323 नुसार सिद्धूवर 34 वर्षापुर्वी गुन्हा दाखल होता. या प्रकरणात जास्तीत-जास्त एका वर्षाची शिक्षा होऊ शकते. समजून घ्या काय आहे हे प्रकरण सात मुद्यांवरुन ...

1. 27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू त्याचा मित्र रुपिंदर सिंग संधू सोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचला. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते.

2. मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धूने गुरनाम सिंगला गुडघ्यावर पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आले होते.

3. सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयात खटला चालला. 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला.

4. 2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले. दरम्यान, सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसरची जागा लढवली आणि जिंकली.

5. उच्च न्यायालयाचा निर्णय डिसेंबर 2006 रोजी आला. उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सिद्धू यांनी लोकसभेचा राजीनामा दिला होता.

6. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धूच्या वतीने खटला लढवला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. 2007 मध्ये सिद्धू पुन्हा अमृतसरमधून निवडणूक जिंकले.

7.1988 मध्ये सिद्धू आणि संधू यांच्यावर दोन खटले दाखल झाले होते. पहिली दोषी हत्या आणि दुसरी रोड रेज. मे 2018 मध्ये, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला रोड रेज प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

8. सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधू यांना रोड रेज एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी