कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. नवव्या फेरीपर्यंत रवींद्र आघाडीवर आहेत.यामुळे भाजपाचे टेंन्शन वाढले आहे. यावर प्रतिक्रिया देताना धंगेकर म्हणाले की, ज्या दिवशी फॉर्म भरला त्याचदिवशी माझा विजय झाला होता. यामुळे भाजप आणि शिंदे गटाने लाखो रुपयांचा पाऊस पाडला. मतपेटीत मतांचा पाऊस पडत आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, मला काहीही टेन्शन नाही आहे. आज मीच बाजी मारणार आहे, हेमंत रासने यांच्याकडे कमळाचं चिन्ह होतं म्हणून ते निवडून येत होते. चिन्हाशिवाय ते शून्य आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.