जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) आज डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांचा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. डाव्या विचारसरणीच्या (Leftist) विद्यार्थ्यांनी आरोप केलाय की, एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मांसाहारी जेवण करण्यापासून रोखलं आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कावेरी वस्तीगृहाच्या मेस सेक्रेटरीला देखील मारहाण केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. (JNU Non Veg Controversy)
जेएनयू कॅम्पसमध्ये एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांवर गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी इतर सहकाऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे, डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी कावेरी वस्तीगृहात रामनवमीच्या पूजेला परवानगी देत नसल्याचा आरोप अभाविपने केला आहे. सध्या जेएनयू कॅम्पसमध्ये या प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे.