भाजपचे ज्येष्ठ नेते व सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागील काही वर्षांपासून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबईला येतात. मात्र, यंदाचा त्यांचा मुंबई दौरा हा आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अधिक चर्चेत आहे. शिवसेनेला मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेतून पाय उतार करण्यासाठी भाजप जोरदार तयारीनिशी मैदानात उतरल्याचं चित्र स्पष्ट आहे.
असा असेल अमित शहांचा दौरा:
केंद्रीय मंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर
दौऱ्यात अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
लालबाग राजाच्या दर्शनानंतर अमित शाहांचे मिशन मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाह बैठक घेणार
महापालिकेवर सत्ता काबीज करण्यास भाजप रणनीती आखणार
राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता:
दरम्यान, भाजपला मुंबई महानगर पालिका काबीज करण्यासाठी राज ठाकरे यांच्या सारखा आक्रमक चेहरा सोबत असणं गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. तर, सध्या भाजप नेत्यांचं राज ठाकरेंच्या घरी येणं जाणं वाढलं असल्यानेही भाजप-शिंदे गट- मनसे युतीच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. त्यामुळे यंदाच्या मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.