बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर रेलरोको आंदोलन देखील करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता बदलापूर शहरात २४ तासानंतर इंटरनेट सेवा पूर्वपदावर आली असून बदलापूर रेल्वे स्थानकात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.