भारतीय पुरूष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले आहे. भारताने जपानला 5-1ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. या सुवर्ण कामगिरीबरोबरच भारताने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही फायनल केले. याचबरोबर भारताची सुवर्ण संख्या 22 वर पोहचली आहे.
जगातील सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकर असलेल्या हरमनप्रीतने आघाडीचे नेतृत्व करत दोनवेळा गोल केल्याने भारताने जपानला 5-1 ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.जपानला संपूर्ण सामन्यात एकदाच भारताची गोलपोस्ट भेदण्यात यश आले. भारताचे यंदाच्या एशियन गेम्समधील हे 22 वे सुवर्ण पदक आहे. या पदकाबरोबरच भारताची सध्याची पदकसंख्या ही 92 वर पोहचली आहे.
सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने ग्रुप स्टेजमधील पाचही सामने जिंकले. टीम इंडियाने ग्रुप फेरीत ५८ गोल केले होते. त्याच्याविरुद्ध केवळ पाच गोल झाले. भारताने उपांत्य फेरीतही पाच गोल केले. मात्र, दक्षिण कोरियालाही तीन गोल करण्यात यश आले. भारताने अंतिम फेरीत पाच गोल केले आणि त्यांच्याविरुद्ध एकच गोल होऊ शकला. म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारताने ६८ गोल केले आणि त्यांच्याविरुद्ध फक्त ९ गोल झाले.