आगामी 2024ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये इंडिया आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टीचा समावेश होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. मायावती आणि प्रियांका गांधी यांची भेट झाल्याने पाच राज्यांमधील निवडणुकांनंतर यासंबंधीची अधिकृत घोषणा होईल, असं म्हटलं जात आहे.
काँग्रेच्या शीर्षस्थ नेत्यांसोबत मायावतींची बोलणी सुरु आहे. मात्र अद्याप त्यांच्यामधली बोलणी निर्णयाप्रत पोहोचलेली नाही. यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा-काँग्रेस आघाडी ठरलेली असतानाही विघ्न आलेलं होतं. विधानसभेच्या १२५ जागांवर काँग्रेस आणि उर्वरित २७८ जागांवर बसपा लढेल, असं ठरलेलं. यासंबंधीच्या बातम्या बाहेर आल्यानंतर सगळंच फिस्कटलं.