राज्यात गारठा वाढताना दिसत आहे. दुपारी उकाडा जाणवत असला तरी मात्र सकाळी आणि संध्याकाळी गारठा जाणवतो. मुंबईत सकाळी गारठा जाणवतो तर दुपारी तापमानात वाढ झालेली पाहायला मिळते.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यातच अनेक ठिकाणी वायू प्रदूषण आणि धुके पाहायला मिळत आहे.