ताज्या बातम्या

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह 6 जण ठार

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. केदारनाथपासून 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाला. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे मानले जात आहे.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते. हेलिकॉप्टरने गुप्तकाशीहून केदारनाथला उड्डाण केले होते. यामध्ये पायलटसह ६ जण होते. हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले असता ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्याने त्याला भीषण आग लागली. या अपघातात सर्व सहाही जणांचा मृत्यू झाला आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, केदारनाथमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अवघ्या 15 मिनिटांत अचानक हवामान खराब झाले. यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या हेलिकॉप्टरमध्ये फक्त प्रवासीच होते, असे त्याने सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21-22 ऑक्टोबर रोजी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार आहेत. मोदी तेथे सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतील. बाबा केदार यांच्या दर्शनानंतर ते बद्रीनाथला जाणार आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी