राज्य सरकारने ‘मेट्रो ३’ (metro 3 ) ची कारशेड आरेमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला असून आरेतील कामावरील बंदीही उठविण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतल्या मेट्रो-तीन मार्गाच्या कारशेडच्या आरेमधल्या बांधकामाविरोधात वनशक्ती संस्थेकडून दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण ऐकून याचिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे.
दरम्यान आरे परिसरातील मुख्य मार्गांवरील काही झाडे छाटणी करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी गोरेगाव चेक नाका ते पवईला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला. मेट्रोचे कोच आणण्यासाठी झाडांची छाटणी सुरू असल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता. मात्र आरे कन्झर्वेशन ग्रुपने आरेतील मेट्रो कारशेडच्या ठिकाणी असलेली झाडे जेसीबीच्या मदतीने पाडण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. आरेमधील मेट्रो कारशेड ज्या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे, त्याठिकाणी अद्याप वृक्षतोड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी असलेली झाडे अद्यापही कापण्यात आली नाहीत अथवा कोणतेही बांधकाम सुरू झाले नाही.
मात्र आता मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोड प्रकरण थेट आता सुप्रीम कोर्टात पोहचला असून या प्रकरणी सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती डी चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. दरम्यान या प्रकरणी सुनावणीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.