Gunratna Sadavarte - Jayashri Patil Team Lokshahi
ताज्या बातम्या

गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा सुनावली कोठडी; सातारा सत्र न्यायालयनं आता तब्बल...

गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

Published by : Sudhir Kakde

सातारा : गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात वकिल गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील (Jayashri Patil) यांना देखील अटक होण्याची शक्यता होती, मात्र त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहे.

मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणात सातारा पोलिसांनी त्यांना अर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेतलं होतं. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अर्थर रोड तुरुंगातून सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोल्हापुर, बीड, पुणे, अकोला अशा अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. साताऱ्यानंतर आता अकोला पोलिसांनी देखील सदावर्तेंना ताब्यात घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. त्यामुळे आता त्यांना अकोला पोलीस ताब्यात घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी