Gunratna Sadavarte Team Lokshahi
ताज्या बातम्या

ST कर्मचाऱ्यांची पैसे घेऊन फसवणूक; सदावर्तेंवर अकोल्यात गुन्हा दाखल

सदावर्ते यांच्यावर कोल्हापूर आणि पुण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.

Published by : Sudhir Kakde

अकोला प्रतिनिधी | अमोल नांदुरकर : अकोल्यातील अकोट शहर पोलिसांत (Akola Police) गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री पाटील, अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST Workers) 300 ते 400 रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

राज्यभरातील तब्बल 74 हजार एसटी कर्मचाऱ्यांना फसवल्याचा आरोप या सर्वांवर करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी प्रफुल गावंडे यांनी आज अटकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली आहे, या दरम्यान त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि अजय गुजरकडून एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचं सांगितले. तसंच सदावर्ते यांनी गुजर मार्फत पैशांची मागणी केली असंही ते म्हणाले आहेत. सध्या प्रफुल गावंडे हा अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे.

दरम्यान, अजय गुजरच्या आव्हानानंतर अकोट आगारातून कर्मचाऱ्यांनी 74 हजार 400 रुपये जमा करून दिले होते. प्रत्येकी 300 रुपये आणि निलंबितांकडून 500 रुपये सदावर्तेंना द्यायचे आहेत अस गुजरनं सांगितलं. ज्या कामासाठी आम्ही पैसे दिले होते, ते काम झालं नाही, त्यामुळे आमची फसवणूक झाली असाही आरोप सदावर्तेंवर करण्यात आला आहे. अजय गुजरला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. अकोला पोलिसांकडून औरंगाबादमध्ये ही अटक करण्यात आली. सदावर्तेंसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. लोकशाहीने पैसे गोळ्या केल्याचा हा प्रकार उघडकीस आणला होता. लोकशाहीच्या बातमीनंतर पोलीसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी