पुणे : छत्रपतींच्या वारसदारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunratna Sadavarte) अडचणीत सध्या मोठी वाढ झाली आहे. सातारा पोलिसांनी (Satara Police) आज सदावर्तेंना अटक केली होती, त्यांनी सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यानंतर सदावर्तेंना आता पुणे पोलीसही (Pune Police) ताब्यात घेतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलताना काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर भावना दुखावल्याने काही लोकांनी सदावर्तेंविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणात आता पुण्याातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात देखील सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता सदावर्तेंना सातारा पोलीसाच्या कोठडीनंतर पुणे पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मराठा आरक्षण प्रकरणात छत्रपती संभाजी राजे आणि उदयन राजे यांच्याबद्दल बोलताना सदावर्तेंनी आक्षेपार्ह भाषा वापरली होती, त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात सदावर्तेंविरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात ९ सप्टेंबर २०२० मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सदावर्तेंना आता पुणे पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता आहे.