भूपेश बारंगे,वर्धा: वेदांत प्रकल्प, एअर बस प्रकल्प व महाराष्ट्रातील इतर मोठे प्रकल्प गुजरात राज्यात जात आहेत. ते थांबवण्याबाबत नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणा याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
दीड लाख कोटी रूपयाचे मोठ मोठे वेदांत व एअर बस प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात नेणे हे योग्य नाही. पुणे स्थित वेदांत प्रकल्प सेमिकंडक्टर प्लाट महाराष्ट्रामधून गुजरात राज्यात वळवला आणि त्याच बरोबर थोडया दिवसानंतर एअर बस प्रकल्प हा हेतुपुरस्पर गुजरात राज्यात वळवणे हा महाराष्ट्र राज्याची अस्मिता संपविण्याचा कट आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना उद्योगामध्ये काम न देता बेरोजगारी वाढविण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. ही बाब लज्जास्पद आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जाणे कितपत योग्य आहे? महाराष्ट्रातील मोठ मोठे प्रकल्प गुजरात राज्यात नेणे हे केंद्र सरकारने ठरवावे. भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील उद्योगिक धोरणात सर्व राज्यांना समान वागणुक दयायला हवी.
महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील मोठे प्रकल्प गुजरात राज्यात नेऊन महाराष्ट्राची अस्मिता कमी करणे, ही बाब योग्य नाही या बाबत हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनेविरोध करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी नगरसेवक सौरभ तिमांडे, संतोषराव तिमांडे, दिवाकर डफ, गौरव घोडे,अमोल त्रिपाठी, युवराज मा ऊसकर रितू मोघे हर्षल तपासे पवन काकडे ओम सावरकर आदर्श त्रिवेदी इत्यादी उपस्थित होते.