गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या घोषणेनंतर गुजरातमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. या विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे. आदर्श आचारसंहिता (MCC) राजकीय पक्षांना धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यापासून प्रतिबंधित करते. भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताच आदर्श आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेचे नियम काय म्हणतात ते जाणून घेऊया.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक नियमही लागू होतात. कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकारणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
या काळात जनतेचा पैसा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाला किंवा नेत्याच्या फायद्यासाठी वापरण्यात येणार नाही.
निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन, सरकारी विमान किंवा सरकारी बंगला वापरला जाणार नाही. कोणतीही अधिकृत घोषणा, उद्घाटन आणि पायाभरणी वगैरे होणार नाही.
कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, राजकारणी किंवा समर्थक यांना रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल.
कोणत्याही निवडणूक रॅलीत धर्म किंवा जातीच्या नावावर मते मागितली जाणार नाहीत.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तत्पूर्वी,
आयोगाने 14 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते, जे 12 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होणार होते आणि 8 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी होणार होती.