Best Govt Schemes For Women : गेल्या काही वर्षांत, भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांना त्यांचे योग्य सामाजिक सन्मान प्रदान करणे आणि कमाईचे मार्ग सुनिश्चित करण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे. सरकार प्रत्येक स्तरावर समानता आणण्यासाठी, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि बालशिक्षणाच्या उन्नतीसाठी पुढे आले आहे.
'महिला सन्मान बचत पत्र'
या योजनेअंतर्गत देशातील महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात. तसेच या बचत खात्यात एक हजार रुपये रक्कमेपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. या योजनेत ७.५% टक्के व्याजदराने परतावा मिळेल. महिलांनी या बचत खात्यात दोन लाख रुपये जमा केल्यानंतर या महिलेला दोन वर्षांनंतर २ लाख ३२ हजार रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसात सुरुवात झालेल्या या योजनेला बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळणार आहे . तसेच खातेधारकाला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. ही योजना पूर्णपणे करमुक्त असेल. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला एप्रिल महिन्यापासून २०२५ पर्यंत बचत खाते उघडू शकतात.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
मोदी सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सरकार गर्भवती महिलांना 5000 हजार रुपये देते. या योजनेतंर्गत गर्भवती महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. मुलं कुपोषित राहू नयेत, त्यांना कुठलाही आजार होऊ नये, यासाठी महिलांना मातृ वंदना योजनेतंर्गत पैसे दिले जातात.
महिला उद्योजकांसाठी सरकारी योजना -
भारतीय महिला बँकेचे व्यावसायिक कर्ज हे नवोदित व्यावसायिक महिलांसाठी आहे. ज्यांना रिअल इस्टेटमध्ये नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा किरकोळ क्षेत्रात लघु आणि मध्यम उद्योग (SME) आहे. महिला उद्योजकांना 20 कोटी रु. पर्यंत कर्ज दिले जाते. या व्यवसाय कर्ज योजनेवर 0.25 टक्के सवलत देखील मिळू शकते. या कर्जाच्या रकमेवरील व्याज दर सामान्यतः 10.15 टक्के किंवा त्याहून अधिक असतो.
सुकन्या समृद्धी योजना
ही एक छोटी बचत योजना असून मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या मुलीचे वय १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तिचे खाते उघडावे लागेल. या योजनेत तुम्ही किमान २५० रुपये गुंतवू शकता. तसेच आपण या योजनेत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना
भारत सरकारने २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. देशातील मुलींच्या लिंग गुणोत्तरातील घट थांबवणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांनाही मदत करत आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजना
देशात अजूनही शा महिलांची संख्या मोठी आहे ज्यांच्याकडे अद्यापही एलपीजी गॅस सिलिंडर नाही. या महिला आजही स्वयंपाकासाठी लाकूड, शेण किंवा इतर साधनांचा वापर करतात. अशा स्थितीत महिलांना स्वयंपाक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही त्यांना उद्भवतात. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे.
शक्तीसदन योजना?
राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी ही योजना जाहीर केली आहे. राज्यात मोठ्या शहरांत 50 नवी वसतीगृहे स्थापन केली जातील. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवण्यात आली आहे.