Eknath Shinde | Devendra Fadnavis Team Lokshahi
ताज्या बातम्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून देवेंद्र फडणवीस चारीमुंड्या चीत !

Eknath Shinde and Devendra Fadnavis : इंटरनेट दुनियेतील लोकांना शिंदे यांच्याबद्दल जाणून घेण्यातच सर्वाधिक उत्सुकता आहे. फडणवीस यांच्या 4 टक्केच्या तुलनेत जगभरात 96 टक्के लोक हे शिंदे यांना शोधत आहेत.

Published by : Team Lokshahi

खरं नाही ना वाटत? पण हे 100% सत्य आहे आणि हे सत्य आहे सायबर विश्वाचे, व्हर्च्युअल दुनियेतील! 15 ते 35 ची पिढी ज्या दुनियेत सर्वाधिक रमते, त्या इंटरनेट जगतात, राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोज भाजपाने डिमोट केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड देऊन चारीमुंड्या चीत करीत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांचा तुलनात्मक सर्च अभ्यास केला असता दिसून येते, की इंटरनेट दुनियेतील लोकांना शिंदे यांच्याबद्दल जाणून घेण्यातच सर्वाधिक उत्सुकता आहे. फडणवीस यांच्या 4 टक्केच्या तुलनेत जगभरात 96 टक्के लोक हे शिंदे यांना शोधत आहेत.

भारतात हे प्रमाण सरासरी शिंदे 76 तर फडणवीस 24% इतके आहे. ज्या दिवशी भाजपा दिल्ली हायकमांडच्या आदेशानुसार, एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली, त्यानंतर इंटरनेटवर शिंदे यांच्याविषयी शोधाशोधी अचानक झूम झूम झ्याक वाढली होती! ज्या आसामात पळून गेलेले फुटीर आश्रयास आणि निगराणीखाली बंदोबस्तात होते, त्या आसामातील सर्वच्या सर्व म्हणजे 100% नेटकरी हे, कोण हा एकनाथ शिंदे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना फडणवीस यांच्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. गोवा, चंदीगड, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्येही सर्व सर्चेस/क्वेरीज या शिंदे यांच्यासाठी आहेत. गुजरातेत हे प्रमाण 75-25 तर महाराष्ट्रात 83-17 इतके आहे. अमेरिकेतून शिंदे यांच्यासाठी 69% तर फडणवीस यांच्यासाठी 31% सर्चेस येत आहेत.

काय शोधताहेत नेटकरी?

1. एकनाथ शिंदे

2. मुख्यमंत्री शिंदे

3. एकनाथ शिंदे जात

4. एकनाथ शिंदे मूळ गाव

5. आनंद दिघे

6. एकनाथ शिंदे माहिती

7. एकनाथ शिंदे कितवे मुख्यमंत्री

8. New CM of Maharashtra

9. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण

10. मीनाक्षी शिंदे

11. एकनाथ शिंदे किस पार्टी के है

12. Eknath Shinde Caste Name

13. एकनाथ शिंदे जाति

14. शिंदे सरकार

नेटकरी जोडीला उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्र राज्यपाल, अमृता फडणवीस, आदित्य ठाकरे, Maharashtra Politics याचाही या अनुषंगाने शोध घेत आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी