ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मजेशीर गाणं ! लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी"

राजकीय वातावरण महाराष्ट्रात सध्या चांगलेच तापले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात जोरदार सक्रिय झाली असून राज्यातील महाविकास आघाडीसह अनेक नेतेमंडळींच्या चौकशीला येत आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक मजेशीर गाणं प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Published by : Team Lokshahi

प्रमोद लांडे ( प्रतिनिधी शिरुर / पुणे )

राजकीय वातावरण महाराष्ट्रात सध्या चांगलेच तापले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात जोरदार सक्रिय झाली असून राज्यातील महाविकास आघाडीसह अनेक नेतेमंडळींच्या चौकशीला येत आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक मजेशीर गाणं प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

सध्या राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोप नेते मंडळी करताना दिसत आहे. तसेच ईडी, सीबीआयची चौकशी महाराष्ट्राला आता नवीन राहिलेली नाही.देशासह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि शिवसेना, तसेच अन्य पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला फेऱ्या माराव्या लागत आहे. अशातच सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, अजित पवार यांसारखे प्रमुख नेते कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना थेट तुरुंगात मुक्काम ठोकावा लागला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक गाणं प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 'लय सुसाट, ताणूताणू मागं लागलीय ईडी, नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा, हे गाणं राष्ट्रवादीकडून आले आहे. या गमतीदार गाण्याची जोरदार चर्चा ही सुरू झाली आहे.

या गाण्याची संकल्पना राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची आहे. तर प्रदिप कांबळे यांनी हे गाणं लिहिलं आहे."पडलाय दणका, मोडलाय मणका, पडलीय चांगलीच पळी, कशी ही यायची पडी, लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी" हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तसंच त्यांनीच या गाण्याला संगीतबद्ध केलंय आणि गायलं सुद्धा आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे