ADV Gunratna Sadawarte Team Lokshahi
ताज्या बातम्या

सदावर्तेंना सातारा न्यायालयाचा दणका: चार दिवसांची कोठडी

Published by : Team Lokshahi

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतेय. सिल्व्हर ओक हल्ला (Silver Oak Attack Case) प्रकरणात न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता सदावर्तेंना साताऱ्यातील (Satara) फलटन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आज सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शरद पवार यांच्या घरावर हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदार्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले आहे. 2020मधील हे प्रकरण आहे. सातारा पोलिसांनी (satara police) सदावर्ते यांना या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांनी संभाजीराजे आणि उदनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्याविरोधात कुणाच्या सांगण्यावरून विधान केले होते, याचा कसून तपास सातारा पोलीस करणार आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी