ताज्या बातम्या

वडील शिंदे गटासोबत, तर मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद

उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरे यांनी हे शिंदे गटाच्या मेळाव्यात उपस्थिती लावलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Published by : shweta walge

शिवसेना आणि शिंदे गट असे दोन्ही गटाचे दसरा मेळावे मुंबईत पार पडले. या मेळाव्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप केल्याचं दिसून आले. मात्र उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरे यांनी हे शिंदे गटाच्या मेळाव्यात उपस्थिती लावलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केले. तर आता त्यांचा मुलगा जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पिता-पुत्रांमध्ये मतभेद असल्याचं उघड झाले आहे.

जयदेव ठाकरे म्हणाले की, “कुणी कुठली बाजू घ्यायची, तो त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाचं आपापलं मत असतं. ते तिथे का गेले, हे त्यांनाच विचारायला हवं. मी या घराचा सर्वात मोठा नातू आहे. मला माझ्या आजोबांबद्दल, उद्धव काकांबद्दल, आदित्यबद्दल प्रचंड आदर आहे. आपल्यासमोरचं हे चित्र फार विचित्र आहे. अशा वेळी माझ्या कुटुंबासोबत असणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो”, असं जयदीप ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले की, “पुढे-मागे जर मला संधी मिळाली किंवा त्यांना वाटलं की माझ्यावर एखादी जबाबदारी सोपवावी, तर ती मी १०० टक्के स्वीकारेन आणि पक्षाला वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेन. रश्मी काकी आणि आदित्य यांच्याशी मी बोलत असतो. दसरा मेळाव्याच्या दिवशीही आम्ही बोललो. उद्धव काकांनाही भेटलो. त्यांना मला व्यवस्थित भेटायचं आहेच. त्यांची वेळ घेऊन लवकरच त्यांना भेटेन”, असंही जयदीप ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

जयदीप ठाकरेंची शिंदे गटाच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया

“जे झालं, ते कुणालाच पटलेलं नाही. ते बरोबर झालेलं नाही. तेही उद्धव काकांना बरं नव्हतं तेव्हा झालं. अशा वेळी सगळ्या कुटुंबीयांनी एकत्र यायला हवं. पण ते सध्या होत नाही आहे. मला जे बरोबर वाटलं, ते मी केलं. मला वाटलं मी दसरा मेळाव्यात जाऊन माझ्या काकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. ते मी केलं”, अश्या शब्दात जयदीप ठाकरेंनी शिंदे गटाच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी