ताज्या बातम्या

Latur: लातूर शहरात भीषण अपघात; जेसीबीने 10 ते 12 जणांना चिरडले

लातूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी चौकात मद्यधुंद अवस्थेत जेसीबी चालकाने राडा घातला आहे.

Published by : Dhanshree Shintre

लातूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी चौकात मद्यधुंद अवस्थेत जेसीबी चालकाने राडा घातला आहे. 10 ते 12 जणांना मद्यधुंद अवस्थेत जेसिबिने चिरडले आहे. यात जेसीबी खाली चिरडून एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांचे गाड्यांचं नुकसान झाले आहे.

जालिंदर मूळे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करत जेसीबी चालकाला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. भाजी विक्रेते आणि जेसीबी चालकांच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या जालिंदर मुळे याचा या अपघात जागीच मृत्यू झाला. तर नागरिकांनी पाठलाग करत जेसीबी चालकाला पोलिसांच्या हवाली केलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी