ताज्या बातम्या

Election Commission : 'या' 3 राज्यात पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या

उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या; 13 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल.

Published by : shweta walge

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. तीन राज्यांतील 14 विधानसभा जागांसाठी आता 13 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरलाच निकाल लागेल.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता उत्तर प्रदेशातील 9, पंजाबमधील 4 आणि केरळमधील 1 विधानसभा जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजप, काँग्रेस, आरएलडी आणि बसपाच्या मागणीनुसार तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

या पक्षांनी सांगितले की 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आणि गुरुनानक देवजींचे प्रकाश पर्व आहे. तर केरळमध्ये 13 ते 15 नोव्हेंबरदरम्यान कलापथी रास्तोलसेवाम साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मतदानावर परिणाम झाला असता.

20 नोव्हेंबरलाच महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होत आहे. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभेच्या जागेवर 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

10 राज्यांमधील 33 जागांसाठी तारखांमध्ये कोणताही बदल नाही. निवडणूक आयोगाच्या आजच्या घोषणेमध्ये 10 राज्यांतील 33 जागांसाठीच्या तारखा बदलण्यात आलेल्या नाहीत. म्हणजेच १३ नोव्हेंबरलाच येथे मतदान होणार आहे. झारखंड विधानसभेच्या 43 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. यासोबतच केरळच्या वायनाड लोकसभा जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे.

15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र-झारखंडसह 14 राज्यांतील 48 विधानसभा आणि 2 लोकसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी