राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील सहभागी होते. दरम्यान या बैठकीत अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. यातच जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आलीय.
अजित पवार यांच्या गटात न गेलेले जयंत पाटील यांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांचे बंधू भगत राजाराम पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. जयसिंगराव पाटील यांच्यासोबत जयंत पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही ईडीकडून नोटीस आली आहे. यामुळे जयंत पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहे.
भगत राजाराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे थोरले बंधू आहेत. त्याचे सातारा मधील सैनिक स्कूल मधून शिक्षण पूर्ण झाले. तर पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या मुंबईत वास्तव्य असून बांद्रा कुर्ला येथे कासेगाव शिक्षण संस्थेचे काम बघतात. तसेच त्यांचे इतर अनेक व्यवसाय सुरू आहेत.