महेश महाले : नाशिक | आज पहाटे 04:04 वाजता नाशिकपासून पश्चिमेला 89 किमी अंतरावर 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 5 किमी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे.
काही दिवसांपुर्वीच कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. किल्लारीसह परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजून, सात मिनिटे व एकवीस सेकंदाला भूकंपाचा भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांना बसला होता. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल असून, भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात असल्याचे व या धक्क्याची खोली जमिनीत पाच कि.मी. अंतरावर असल्याचे लातूरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले होते. भूकंप किल्लारीसह यळवट, सिरसल, पारधेवाडी, कार्ला, कुमठा, नदीहत्तरगा, सांगवी, जेवरी, तळणी, बाणेगावसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांत जाणवला. गेल्या सहा महिन्यांपासून किल्लारीत भूकंपाचा धक्का जाणवला नाही.