Draupadi Murmu and Narendra Modi Team Lokshahi
ताज्या बातम्या

द्रौपदी मुर्मू उद्या घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; जाणून घ्या कसा असेल शपशविधी सोहळा

जाणून घ्या नेमका कसा असेल शपथविधी सोहळा.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू सोमवारी देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संसद भवनात विशेष तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह देशातले सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. जाणून घेऊ नेमका कसा असेल शपथविधी सोहळा.

1. 25 जुलै 2022 रोजी शपथविधी द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

2. सोमवारी सकाळी 10.25 वाजता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत.

3. द्रौपदी मुर्मू सकाळी 8.15 च्या सुमारास दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून निघतील, त्यानंतर त्या राजघाटावर जातील.

4. राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर त्या सकाळी 9.22 वाजता राष्ट्रपती भवनात पोहोचतील.

5. जर पाऊस पडला नाही तर, विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद सकाळी 9.42 वाजता राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर द्रौपदी मुर्मूंचं स्वागत करतील.

6. सकाळी 9.50 वाजता स्वागत समारंभानंतर विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह द्रौपदी मुर्मू संसद भवनाकडे रवाना होतील. यावेळी राष्ट्रपतींचा ताफाही त्यांच्यासोबत असेल.

7. द्रौपदी मुर्मू आपल्या ताफ्यासह सकाळी 10 वाजता संसद भवनाच्या गेट क्रमांक ५ वर पोहोचतील.

8. संसद भवनात पोहोचताच पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष त्यांना सेंट्रल हॉलपर्यंत घेऊन जातील.

9. द्रौपदी मुर्मू संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये येताच राष्ट्रगीत वाजवलं जाईल.

10. पदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू ओथ रजिस्टरवर स्वाक्षरी करतील.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे