दसऱ्यानिमित्त आज बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे तब्बल १२ वर्षांनंतर एका मंचावर आले. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही या मेळाव्याला उपस्थिती लावली. या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता नारायण गडावरील मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
"या विचारांच्या दसरा मेळाव्यात अनेक वेळा संकटाच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेबांपासून पंकजा ताईपर्यंत... आज १२ वर्षांच्या तपानंतर या दसरा मेळाव्याच्या माझ्या बहीणीच्या आणि परंपरेच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मी इथे आलो आहे. ताई तुम्ही अनेक संघर्षातून हा मेळावा केला. मी तुमचे आभार आणि अभिनंदन करतो की, तुम्ही कुठल्याही संकटाला घाबरला नाहीत. सोबत कोण आहे कोण नाही हे पाहिलं नाही. पण समोरची ही मायबाप जनता सोबत आहे, त्यांचे आशीर्वाग आहेत.... पण मी एक नक्कीच केलं, भलं आपलं मधले १२ वर्ष जमलं नसेल पण मी कधी वेगळा दसरा मेळावा करायचं मनात देखील आणलं नाही. कारण जो वारसा ज्याला दिलाय त्याने तो...."
"आज मला जेवढा आनंद होतोय, पंकजा ताईंना जेवढा आनंद होतोय त्यापेक्षा जास्त आनंद मी तुमच्या डोळ्यात पाहायतोय….इथे आलेला समुदाय आणि बघत असलेला समुदाय सर्वजर एकसंघ झाला तर या पवित्र दसरा मेळाव्याची एखादा नवीन मेळावा चालू करून कोणीही पवित्रता संपवू शकत नाही. ही ताकद पंकजा ताईंमध्ये आहे", असेही धनंजय मुंडे म्हणाले.