सोलापूर : मंत्री धनंजय मुंडे यांनी सोलापुरातून भाजप आणि राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे. देशात महागाई वाढतेय त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही, हे लोक फक्त भोंगा आणि हनुमाान चालिसेबद्दल (Hanuman Chalisa Row) बोलतात. देशातले महागाई सारखे मुद्दे लपवायचे आहेत, त्यामुळे यांना भोंगे, हनुमान आणि सियावर रामचंद्र, शिवशंकर आठवतात असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले. तसंच ते पुढे म्हणाले की, महागाईसारखे मुद्दे लपवण्यासाठी या सर्व गोष्ट भाजपला आठवतात असं मुंडे म्हणाले.
विरोधक महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की महाविकास आघाडीमध्ये दहापट हुशार लोक आहेत. यांनी दहा जन्म घेतले तरी महाविकास आघाडीचं काही वाईट करु शकत नाही असं धनंजय मुंडे म्हणाले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ऊसतोड कामगार महामंडळ मी माझ्याकडे घेतलं. माझ्या वडीलांनी २-४ वर्ष का होईना ऊस तोडलाय. मुंडे साहेबांचं स्वप्न महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पुर्ण करता आलं. कारण फक्त महामंडळ काढलं नाही, तर त्याचं कार्यालय पुण्यात तयार केलं. त्यामाध्यमातून आता राज्यात १ टन ऊस निघाला की, १० रुपये जमा होणार आणि त्यासोबत सरकार सुद्धा १० रुपये टाकणार असं मुंडे म्हणाले.
ऊसतोड मजुरांचे मोठे कष्ट आहे, ऊस तोडताना घरा-दाराचा विचार कामगारांना करता येत नाही. असा अघोरी श्रम मी कधी पाहिला नाही. यंत्रावर हार्वेस्टींग होऊ शकतं तर बॅटरीवर चालणारा कोयता मिळू शकत नाही का? असं म्हणत धनंजय मुंडेंनी येणाऱ्या काळात त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं.