आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीत (ED) चौकशी झाली आहे. चौकशीचं निमित्त करुन काँग्रेसने देशातच्या विविध शहरांमध्ये लोकांना वेठीस धरण्याचं काम केलं. ईडीची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिक केजेएल कंपनीचे मालक होते. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने यंग इंडियन कंपनी सुरू करुन त्यावर आपली मालकी प्रस्तावित केली. त्यानंतर त्यांनी 2 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी हडप केली. याप्रकरणी हा संपूर्ण भ्रष्टाचार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आज देवेंद्र फडणवीस मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी ईडी चौकशीवरून गांधी कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील (National Herald Case) हा मोठा घोटाळा आहे. काँग्रेसकडून (congress) कार्ड घेण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न गांधी कुटुंबाने केला आहे, त्यामुळे त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. या कंपनीचं राष्ट्रीयीकरण होणे अपेक्षित होते पण गांधी कुटुंबाने त्यांच्या हक्क हिरावला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही अवमान केला आहे. मी सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असंही राहुल गांधी म्हणाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मला विश्वास की आम्ही ५वी जागा जिंकणार
आमची अपेक्षा अशी होती की सत्तारुढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी, सत्तेतील काही लोकांनी हा प्रयत्न केला, पण ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, आम्ही ५ जागा लढवतोय, सत्तारुढ पक्षात खूप मोठा अनरेस्ट आहे, त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवीये, म्हणून आम्ही ५वी जागा लढवतोय, त्याचे काही आराखडे तयार केले आहेत, हे सोपं नाहीये, पण मला विश्वास की आम्ही ५वी जागा जिंकणार.