शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा असल्याने हा दसरा मेळावा महत्वाचा असणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे.
शिवाजी पार्कसह, आझाद मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या दोन्ही मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. कार्यकर्त्यांची मेळाव्यासाठी लगबग पाहायला मिळते आहे.
तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मात्र दसरा मेळाव्याच्या आदल्या दिवशी परतीचा पाऊस झाला. संपूर्ण मैदानात चिखल झालेला पाहायला मिळत आहे.
आझाद मैदानासह शिवाजी पार्कवर देखील पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. मुंबईतील दसरा मेळाव्याला पावसाचा फटका बसला आहे. यातच आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.