कोरोनाने राज्यात अगदी धुमाकूळ घातला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडी हा उत्सव मोठा उत्साहात साजरा होत आहे. उत्साहात गोविंदा अधिकाधिक थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाला आहेत. दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा मोठी तयारी केली आहे. जास्तीत जास्त थर लावणाऱ्या पथकाला लाखोंची बक्षिसे मिळणार आहे.
मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. दादरमधील आयडियलच्या गल्लीत दही हंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महिला गोविंदा हंजी फोडण्यासाठी सज्ज झाल्यात. पहिली मानाची हंडी महिलांनी फोडली.