अमजद खान, कल्याण
काँग्रेस ने भारत जोडो यात्रा सुरू केली केली आहे. ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्ष पद फॉर्म भरण्याची तारीख,भूमिका जाहीर केली आणि मुख्यमंत्री पद सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. काँग्रेसवर आता कोणाचाच कंट्रोल राहिलेला नाहीये. दररोज वेगवेगळी नावे आपल्याला बघायला मिळत आहेत.
इकडे भारत जोडो आंदोलन सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस तुटायला लागली आहे. भारत जोडायचा की काँग्रेस जोडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचा मिश्किल टोला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी काँग्रेसला लगावला.
पालकमंत्री पदी शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेवकांनी फेसबुक वर आपले नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील आमदारांना पालकमंत्री पद द्या अशी पोस्ट केली होती. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील याबाबत मला काय बोलायचं नाही ,मात्र यापूर्वीची रचना होती त्या पद्धतीने काही कार्यकर्त्यांनी मागणी केली असेल मात्र आता सत्तेत एकत्र आहोत, पालकमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून भाजप आणि शिवसेना एकत्र मिळून घेतला त्यामुळे त्याच्यावर मी भाषा करणं उचित नाही. असे ते म्हणाले.