ताज्या बातम्या

Sonia Gandhi ED Enquiry : काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोरिवली स्टेशनवर सौराष्ट्र एक्स्प्रेस रोखली; ईडी कारवाईविरोधात आक्रमक

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं मुंबईत जोरदार आंदोलन; बोरिवली स्थानकात रेल्वे ट्रेन रोखली. पोलिसांकडून आंदोलकांना रुळावरून हटवण्याचा प्रयत्न.

Published by : Shweta Chavan-Zagade

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. याचपार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसकडून मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच बोरिवली स्थानकात सौराष्ट्र एक्स्प्रेस रोखण्यात आली. दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना रुळावरून हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची याआधी मागील आठवड्यात गुरुवारी चौकशी करण्यात आली होती. जवळपास साडे तीन तासांच्या चौकशीनंतर सोनिया गांधी यांना घरी जाण्यास ईडीने परवानगी दिली. दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांच्या अगोदर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचीही ईडीने चौकशी केली होती. राहुल गांधी यांची पाच दिवस 50 तास चौकशी केली होती. सोनिया गांधी यांचीही चौकशी त्या दरम्यान होणार होती. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी चौकशी पुढे ढकलण्याची विनंती ईडी अधिकाऱ्यांना केली होती.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर मुंबईतही मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray LIVE: विधानसभेचा निकाल अनपेक्षित: उद्धव ठाकरे

Fadnavis on Vidhansabha Result: बावनकुळेंच्या अध्यक्षतेमुळे पक्ष जिवंत राहिला - फडणवीस

Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा