नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Hearald Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी केली. असिस्टेंट डायरेक्टर दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांनी तब्बल तीन तास त्यांची चौकशी केली. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास राहुल गांधी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. परंतु चौकशी पुर्ण झाली नाही. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास पुन्हा त्यांची चौकशी सुरु झाली. त्यानंतर ही चौकशी रात्री ९.३० वाजेपर्यंत चालली. यामुळे राहुल गांधी यांची चौकशी तब्बल ८ तासांपेक्षा जास्त काळ चालली.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाची पहिल्यांदा चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित सर्वच काँग्रेस नेत्यांची चौकशी सुरु झाली.
राहुलच्या हजेरीपूर्वी प्रियंका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. येथून राहुल-प्रियांका काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला. नेत्यांना पुढे जाऊ दिले नाही. राहुल गांधी प्रियंकासोबत कारने ईडीच्या मुख्यालयात पोहोचले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची ईडी 3 टप्प्यात चौकशी करणार आहे. त्यात 55 प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे राहुल गांधी यांच्यांकडून हवी आहेत. पहिल्या टप्प्यात ईडीचे अधिकारी राहुल गांधींना वैयक्तिक प्रश्न विचारले. दुसऱ्या टप्प्यात विचारले प्रश्न यंग इंडिया कंपनीबाबत होते. या कंपनीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची जास्त जवळपास 38-38 टक्के आहे. तिसऱ्या टप्प्यात एजेएलबाबत प्रश्न आहे.