bjp operation lotus Team Lokshahi
ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये काँग्रेसला 'ऑपरेशन लोटस'ची भीती, आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवण्याची शक्यता

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भीती वाटत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भीती वाटत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसला भीती वाटत आहे की, भाजप आपल्या विजयी आमदारांना त्यांच्यात सामील करुन घेऊ शकते, ही भीती ‘ऑपरेशन लोटस’ लक्षात घेऊन काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला पाठवण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा या परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत आणि त्या आज शिमला येथे पोहोचण्याची शक्यता आहे. आज निवडणुकीच्या निकालानंतर जनता पुन्हा भाजपला संधी देणार की काँग्रेसला हे ठरणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान झाले. यावेळी राज्यातील 55 लाख मतदारांपैकी सुमारे 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिमाचल प्रदेशमध्ये ६८ सदस्यांची विधानसभा आहे. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात होते, त्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. काँग्रेसला आपल्या विजयाची खात्री असताना भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : राज ठाकरेंना धक्का; माहिम मतदारसंघातून अमित ठाकरेंचा पराभव, महेश सावंत यांचा विजय

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव

शरद पवार गटाला अजित पवारांचा दे धक्का; सचिन पाटील विजयी