कोकणातील राजापूर सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरु आहे. कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी आता समितीची स्थापना करण्यात येत आहे. या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिकांची जोरदार निदर्शने सुरू आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला कडाडून विरोध आहे.
याच पार्श्वभूमीवर . कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी आता समितीची स्थापना करण्यात आली आहे. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी याबद्दल निर्णय झाला.
सौदी अरेबिया भारतात 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पानं बाधा होईल. या भितीने ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द केल्याच्या अधिसूचनेनंतर आता बारसूतील सोलगाव परिसरात ती 'क्रूड ऑइल रिफायनिंग' कंपनी प्रस्तावित आहे. यावेळी मोदी म्हणाले की, रत्नागिरी प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ होणार आहे.