पुणे |अमोल धर्माधिकारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याप्रकरणी पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी याचिका दाखल केलेले होती. न्यायालयाने आता याप्रकरणी आदेश दिल्यानं एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमधून बाहेर पडत शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले अन् ते भाजपसोबत सत्तेत आले. गेल्या 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता या प्रकरणामूळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार का? हे पाहावं लागणार आहे.
युती झाली पण वाद काही मिटेना
"दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका." असं ट्विट माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पूत्र निलेश राणेंनी केली आहे. राज्यात सध्या युतीचं सरकार आलेलं असून, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातलं हे सरकार अडीच वर्ष टीकेल, पुढच्या विधानसभेत 200 जागा निवडून आणू असा विश्वास भाजप आणि शिंदे गटाकडून व्यक्त केला जातोय. मात्र दुसरीकडे टीका टिपण्यांचं हे सत्र संपता संपण्याचं नाव घेईना. भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावर निलेश राणेंनी केलेल्या या टिकेचे आता काय परिणाम होतात, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.